कुडाळ मालवण तालुक्यातील रस्त्यांच्या विशेष दुरुस्ती करिता 20 कोटी निधीची मंजुरी
सिंधुदुर्ग :
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी वारंवार केलेल्या पाठपुराव्यामूळे रस्ते व पुल परिरक्षण व दुरूस्ती कार्यक्रम अंतर्गत एकूण २० कोटी रक्कमेच्या निधीची कामे मंजूर करण्यात आली.
कुडाळ मालवण तालुक्यामध्ये अनेक योजनांच्या माध्यमातून स्थानिक आमदार वैभव नाईक मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करून घेत आहेत. अनेक योजना आणि बजेट हेड यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी थेट कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघामध्ये आणण्याकरिता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासह संबंधित सर्व मंत्री व सचिव स्तरीय अधिकारी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून आवश्यक जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सातत्याने आमदार वैभव नाईक करीत असतात.
दरम्यान कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाकरिता खालील नमूद एकूण २० कोटी रक्कमेच्या निधीची कामे रस्ते व पुल परिरक्षण व दुरूस्ती कार्यक्रम अंतर्गत मंजूर करण्यात आली आहेत.
१. मठ कुडाळ पणदूर घोटगे रस्ता रा.मा.१७९ मध्ये मजबूतीकरण व नुतनीकरण करणे.
– ४ कोटी ३९ लक्ष
२. चौके धामापूर कुडाळ रस्ता प्रजिमा ४१ सुधारणा व डांबरीकरण करणे . ता. कुडाळ
– ३ कोटी २४ लक्ष
३. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मालवण वायरी देवबाग प्रजिमा – २८ मध्ये विशेष दुरुस्ती करणे
– १ कोटी ३५ लक्ष
४. सिंधूदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील ओझर कांदळगाव मोगरणे मसुरे बांदीवडे आडवली भटवाडी रस्ता प्रजिमा ५२ मध्ये विशेष दुरुस्ती करणे . ता. मालवण
– १ कोटी ९६ लक्ष
५. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील सुकळवाड तळगाव बाव प्रजिमा – २७ मध्ये रस्त्याची विशेष दुरुस्ती करणे. ता. मालवण
– १ कोटी २५ लक्ष
६. मालवण कसाल रस्ता रा.मा. १८२ मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे.
– ४ कोटी १२ लक्ष
७. सिंधूदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील कुडाळ पावशी घावनळे आंबेरी माणगाव कांदुली आंबेगाव कुणकेरी कोलगाव रा.मा .१८१ ला मिळणारा रस्ता मध्ये विशेष दुरुस्ती करणे.
– २ कोटी ९८ लक्ष
असे एकूण २० कोटी ची कामे मंजूर करण्यात आली असून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामांना सुरुवात होणार आहे, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.