You are currently viewing जिल्हास्तरीय किल्ले बांधणी स्पर्धेत पियाळीतील गोवर्धन ग्रुपचा खांदेरी किल्ला ठरला अव्वल…!

जिल्हास्तरीय किल्ले बांधणी स्पर्धेत पियाळीतील गोवर्धन ग्रुपचा खांदेरी किल्ला ठरला अव्वल…!

तंबाखु प्रतिबंध अभियान तळेरे आणि श्रावणी कंप्युटर तळेरे आयोजित जिल्हास्तरीय किल्ले बांधणी स्पर्धेचा निकाल जाहीर

बांधणी नव्या विचारांची, सांगड नवोन्मेषाची किल्ले स्पर्धेचा निकाल जाहिर

तळेरे

डॉ. अनिल नेरुरकर प्रेरित तंबाखु प्रतिबंध अभियान तळेरे आणि श्रावणी कंप्युटर तळेरे आयोजित जिल्हास्तरीय किल्ले स्पर्धेत कणकवली तालुक्यातील पियाळी येथील गोवर्धन गृपच्या खांदेरी किल्ल्याला प्रथम क्रमांक मिळाला. या स्पर्धेचे हे आठवे वर्ष होते. यामध्ये 30 पेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. कोरोनाच्या महामारीचा मुकाबला करणे मोठे संकट उभे राहिले. अनेकांचे आयुष्य विस्कळीत होत वैयक्तिक पासून ते अगदी देशसीमेपल्याड अर्थव्यवस्था कोलमडली आहे. म्हणूनच

यावर्षीच्या किल्ले स्पर्धेचा दरवर्षीप्रमाणे तंबाखुमुक्ती हा तर विषय होताच, त्यासोबत कोरोनाच्या संकटात आपल्या महाराजांच्या युक्तीने आणि छ. शंभू राजांच्या शक्तीने आपल्या स्वराज्याची उभारणी आपण कशी करता येईल हा मुद्दा अधोरेखित करावयाचा होता. दूरदृष्टी, दृढता, कल्पकता,  जिद्द, चिकाटी, जिज्ञासा, मेहनत, सातत्य, चपळाई, साहस अशा साऱ्यांना एकवटून स्वावलंबी बनू अन उद्योजकतेची पायरी रचू हा या स्पर्धेमागिल मुख्य हेतू असल्याचे स्पर्धा प्रमुख सौ. श्रावणी मदभावे यांनी सांगितले.
या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-
प्रथम क्रमांक – गोवर्धन ग्रुप पियाळी (किल्ल्याचे नाव-खांदेरी) (पियाळी, ता. कणकवली)

द्वितीय क्रमांक – विकल्प ग्रुप मालवण (किल्ल्याचे नाव-सिंधुदुर्ग) (मालवण)

तृतीय क्रमांक – मेध-स्पर्श ग्रुप नाधवडे (किल्ल्याचे नाव-रामगड)(नाधवडे)

उत्तेजनार्थ विभागून – शिवमुद्रा ग्रुप कट्टा (किल्ल्याचे नाव-रायगड) (कट्टा- मालवण) आणि

गट नं.१ जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा गवाणे. (किल्ल्याचे नाव-प्रतापगड) (गवाणे-देवगड)

उत्कृष्ट तंबाखूमुक्ती संदेश – गट नं.२जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा गवाणे. (किल्ल्याचे नाव-प्रतापगड) (गवाणे-देवगड)

उत्कृष्ट उद्योजकता – थ्री स्टार ग्रुप कांदळगाव(किल्ल्याचे नाव-सिंधुदुर्ग) (कांदळगाव- मालवण)

उत्कृष्ट संकल्पना – शिवाजी पार्क लायन्स ग्रुप कांदळगाव (किल्ल्याचे नाव-सिंधुदुर्ग) (कांदळगाव- मालवण)

उत्कृष्ट किल्ले बांधणी – श्रमबिंदू ग्रुप एडगाव (किल्ल्याचे नाव-विजयदुर्ग) (एडगाव वैभववाडी)

सहभाग – S.A मराठा ग्रुप बांदा (किल्ल्याचे नाव-मोरगड) (बांदा)

या स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे रोख रुपये ५००८, ३००८, व २००८ तर उत्तेजनार्थ १००८ रक्कम आणि आकर्षक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच, सर्व सहभागी संघांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेचा बक्षिस वितरण लवकरच मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे आयोजक सौ.श्रावणी मदभावे व सतिश मदभावे यांनी सांगितले.

जिल्हास्तरीय किल्ले स्पर्धेतील सर्वोत्तम बांधणी करण्यात आलेले किल्ले व स्पर्धक

प्रतिक्रिया व्यक्त करा