“अटल प्रतिष्ठान व आजी- माजी सैनिक उत्कर्ष मंडळ वेर्ले आयोजित आरोग्य शिबीराला उस्फूर्त प्रतिसाद
सावंतवाडी
सह्याद्रीच्या कुशीतील सैनिकांचे गाव म्हणून ओळखल्या जाणार्या वेर्ले या गावात अटल प्रतिष्ठान व आजी माजी सैनिक उत्कर्ष मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आरोग्य शिबीराला वेर्ले,शिरशिंगे,ओवाळिये
कलमिस्त या गावातील सुमारे तीनशेहून जास्त रुग्णांनी लाभ घेतला.
अटल प्रतिष्ठानचे विश्वस्त व माजी सैनिक श्री बाळकृष्ण लिंगवत यांच्या ६५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सैनिक भवन वेर्ले येथे आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबीरात तपासणी करून रुग्णांना मोफत औषधोपचार करण्यात आला.यासाठी केसरी फार्माचे संचालक व उद्योजक श्री राजेंद्र उर्फ राजू केसरकर यानी लागणारी सर्व औषधे प्रायोजित केलेली होती.
या शिबीरात फिजीशियन डॉक्टर अभिजीत चितारी ,स्ञी रोग तज्ज्ञ डॉ.राजेश नवांगुळ,नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.नेहा सावंत,मुञरोग तज्ज्ञ डॉ.सागर कोल्हे,बालरोगतज्ज्ञ डॉ.संदिप सावंत, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.निखील अवधूत, एम.एस सर्जन डॉक्टर अनिकेत वजराटकर, दंतरोग तज्ज्ञ विनय सुर्यवंशी,होमिओपॅथिक डॉ.संजीव लिंगवत यानी रुग्णांची तपासणी केली.
ज्याना पुढील उपचाराची गरज आहे अशानां आयुष्यमान भारत योजनेंतर्गत उपचार देण्यात येणार आहेत.शिबीरात आयुष्यमान भारत नोंदणीचीही व्यवस्था केल्याने अनेकानी हा लाभ घेण्यासाठी नोंद केली.
शिबीराचे उद्घाटन कलमिस्त पंचायत समिती सदस्य मा.श्री प्रथमेश सावंत यानी केले.
आपल्या प्रास्ताविक संबोधनात अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष अँड.नकुल पार्सॅकर यानी भविष्यात अटल प्रतिष्ठानच्या वतीने जिल्ह्यातील खाजगी डॉक्टरांच्या सहाय्याने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अशी आरोग्य शिबीर घेऊन ग्रामीण भागातील जनतेमध्ये आरोग्य विषयक सजगता निर्माण करणार असल्याचे सांगितले.डॉक्टर राजेश नवांगुळ यानी आयुष्यमान भारत योजनेची सविस्तर माहिती. दिली.बालरोगतज्ज्ञ डॉक्टर संदिप सावंत यानीही आपले विचार मांडले.
यावेळी अटल प्रतिष्ठानच्या वतीने माजी सैनिक बाळकृष्ण लिंगवत यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच आताच एम.बी.बी. एस.ची पदवी प्राप्त केलेले यश राजेश नवांगुळ याचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी सैनिक श्री हनुमंत राणे,श्री महादेव लिंगवत, महादेव राणे,संतोष राऊळ,अटलच्या समन्वयक कु.ज्योती
राऊळ,नाना शेंडगे,सौ.मनिषा नवांगुळ ,वेर्लेच्या पोलीस पाटील सौ.प्रियांका सावंत,चितारी हाॅस्पिटल व यशराज मॅटर्निटी हाॅस्पिटलचे कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
आभार प्रदर्शन अटल प्रतिष्ठानचे कार्यवाह श्री रघुनाथ तानावडे यानी केले तर सुञसंचालन अटलच्या खजिनदार श्रीमती अर्पिता वाटवे यानी केले.
