मालवणचा बंटी सारंग ठरला रौप्य महोत्सवी ‘सिंधुदुर्ग श्री २०२६’ चा मानकरी
जिल्हास्तरीय रौप्य महोत्सवी “सिंधुदुर्ग श्री” स्पर्धा : कांदळगांव येथे आयोजन
मालवण
बेस्ट शिव-हनुमान मंदिर ट्रस्ट, सांताक्रुज, मुंबई व बेस्ट शिव- हनुमानवान व्यायाम शाळा, कांदळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने, सिंधुदुर्ग जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच कार्यसम्राट आमदार निलेश राणे यांच्या सौजन्याने कांदळगाव येथे आयोजित मानाच्या जिल्हास्तरीय रौप्य महोत्सवी “सिंधुदुर्ग श्री” स्पर्धेत नगरपालिका जिम, मालवणचा व्यायामपटू बंटी सारंग हा रौप्य महोत्सवी सिंधुदुर्ग श्री २०२६ चा मानकरी ठरला.
बेस्ट पोजर म्हणून अमित कदम, फ्युचर जिम, फोंडा व बेस्ट इम्प्रुव्ह म्हणून गणेश सातार्डेकर नगरपालिका जिम, मालवण याची निवड करण्यात आली. सावंतवाडी येथील सौरभ वारंग पुरस्कृत बेस्ट लेग-अमित कदम, बेस्ट चेस्ट- बंटी सारंग, आणि बेस्ट बॅक- गणेश सातार्डेकर यांनी सन्मान चिन्ह मिळवली.
