You are currently viewing क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले

क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*”क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले”*

 

महात्मा फुले थोर समाजसेवक ज्ञात

भेदाभेद टाळून समाज करती सज्ञानIIधृII

लाभले माता पिता चिमणाबाई गोविंद

जन्मले सुपुत्र कटगुण खेडेगावांत

बाल ज्योतिबांचे सुगुण दिसती उपजतII1II

बुद्धिमान हुशार विद्यार्थी म्हणून प्रख्यात

मातृछत्र हरपले त्यांचे बालवयांत

स्वकर्तुत्वाने झाले सुशिक्षित अल्पावधीतII2II

सर्व अभ्यास पूर्ण केला पाच वर्षांत

सर्वांना शिक्षित करण्याचे स्वीकारले व्रत

दिन दुबळ्यांसाठी निर्मिती शाळा सहेतII3II

सावित्रीबाईंना केले शिक्षिका शिकवून

स्त्री शिक्षणाला दिले प्राधान्य कार्य महान

वेचले जीवन दोघांनी विरोध सोसूनII4II

शेतकऱ्यांचे गरिबांचे कनवाळू प्रसिद्ध

सत्यशोधक समाज स्थापिला सन्मानार्थ

समाजाने महात्मा उपाधीनं केले सन्मानितII5II

शेतकऱ्यांचा आसूड ग्रंथ लिहिले तिसरे रत्न

गुलामगिरी अस्पृश्यांची कैफियत ग्रंथ

सार्वजनिक सत्यधर्म निर्मिला थोर ग्रंथII6II

विद्येविना मतिविना नीतिविना अनर्थ

गतिविना वित्तविना शिक्षणाविना व्यर्थ

शिक्षित केले समाजाला दिली शिकवणII7II

 

©️काव्य:श्री अरुण गंगल कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा