You are currently viewing कर्करोग आणि हृदयविकाराच्या समस्यांपासून दूर ठेवण्यात प्रभावी लाल केळी जाणून घ्या फायदे

कर्करोग आणि हृदयविकाराच्या समस्यांपासून दूर ठेवण्यात प्रभावी लाल केळी जाणून घ्या फायदे

मुंबई :

जर तुमचा आहार चांगला असेल, तर तुमचे आरोग्यही चांगले राहते. आपण खाण्यापिण्याच्या अनेक नियमांचे पालन करतो. चांगल्या आरोग्यासाठी, आपण अधिकाधिक फळांचे सेवन करतो, ज्यामध्ये केळीचा देखील समावेश आहे. केळी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. यामध्ये बरेच पोषक घटक देखील असतात, जे आपले आरोग्य निरोगी ठेवण्याचे काम करतात. केळी हे जगभरात खाल्ले जाणारे फळ आहे.

केळी सर्वांनाच खूप आवडतात. आतापर्यंत तुम्ही पिवळ्या आणि हिरव्या रंगाची केळी खाल्ली असतील, परंतु तुम्ही कधी लाल रंगाची केळी पहिली आहेत का? कदाचित नसतील.

परंतु, आज आपण लाल केळींबद्दल जाणून घेणार आहोत. ऑस्ट्रेलियासह इतर देशांमध्ये लाल रंगाची केळी पिकवली जातात. या केळीला ‘रेड डक्का’ही म्हणतात. चला तर, या लाल केळीचे आरोग्यासाठी असलेल्या फायद्यांविषयी जाणून घेऊया…

लाल केळ्यामुळे आरोग्यास होणारे फायदे.

रक्त गठ्ठा गोठत नाही.

सहसा आपण हिरव्या आणि पिवळ्या अशा दोन रंगांच्या केळ्यांचे सेवन करतो, ज्यात अनेक पोषक घटक असतात. परंतु, लाल रंगाच्या केळीमध्ये या दोन केळींपेक्षा जास्त पोषक घटक असतात. लाल केळींमध्ये खनिजे, जीवनसत्त्वे, भरपूर फायबर आणि चांगले कार्बोहायड्रेट असतात. यात सामान्य केळीपेक्षा बर्‍याच अधिक प्रमाणात बीटा कॅरोटीन असतात. बीटा कॅरोटीनमुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्त साठून राहत नाही.

कर्करोग आणि हृदयरोगाला दूर ठेवतात.

असे मानले जाते की, लाल रंगाच्या केळीचे सेवन कर्करोग आणि हृदयाशी संबंधित आजार दूर ठेवते. आपले हृदय निरोगी ठेवण्यासाठी लाल केळी अतिशय प्रभावी आहेत. लाल केळीमध्ये असणारे पोषक घटक, छातीत होणारी जळजळ कमी करण्यास आणि हृदयरोगांपासून दूर ठेवण्यास देखील प्रभावी ठरतात .

वजन कमी करण्यास प्रभावी.

लाल केळीत फारच कमी कॅलरी असतात, म्हणून हे तुमचे वजन कमी करण्यास देखील उपयुक्त ठरू शकते. या केळींचे सेवन केल्याने पोट बर्‍याच वेळेसाठी भरलेले राहते, ज्यामुळे आपण जास्त अन्न खाणे टाळतो आणि यामुळे वजन वाढण्यास प्रतिबंध होतो.

ऊर्जेचा चांगला स्रोत.

लाल केळी हा सामान्य केळींपेक्षा ऊर्जेचा चांगला स्रोत मानला जातो. लाल केळीचे सेवन केल्याने आपल्याला त्वरित ऊर्जा मिळते. या केळीत असलेली नैसर्गिक साखर शरीराला त्वरित उर्जा देण्याचे काम करते.

अशक्तपणाची दूर करण्यात फायदेशीर.

लाल रंगाच्या केळ्यामध्ये जीवनसत्त्वे आणि अँटी-ऑक्सिडेंट्समध्ये भरपूर प्रमाणात आढळतात. याच्या सेवनाने हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. या व्यतिरिक्त व्हिटामिन बी 6ची कमतरता देखील याद्वारे पूर्ण होते. व्हिटामिन बी 6 अशक्तपणावर मात करण्यास प्रभावी ठरू शकते.

रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त लाल केळीत भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतात. दररोज लाल केळीचे सेवन केल्यास रक्तदाब नियंत्रित राहतो. यामध्ये भरपूर पोटॅशियममध्ये देखील आढळते, जे आपल्या हृदयाविकाराच्या धोक्यापासून दूर राहण्यात देखील मदत करते.

प्रतिक्रिया व्यक्त करा