You are currently viewing सावंतवाडीतील पाणीपट्टी वाढीच्या ठरावाला आमदार केसरकरांचा विरोध…

सावंतवाडीतील पाणीपट्टी वाढीच्या ठरावाला आमदार केसरकरांचा विरोध…

सावंतवाडीतील पाणीपट्टी वाढीच्या ठरावाला आमदार केसरकरांचा विरोध…

सावंतवाडी

शहराची पाणीपट्टी वाढविण्यासंदर्भात नगराध्यक्ष संजू परब यांनी शिवसेनेचा विरोध डावलून घेतलेल्या पाणीपट्टीच्या ठरावाला आमदार दिपक केसरकर यांनी आक्षेप नोंदविला. चुकीच्या पद्धतीने पाणीपट्टीत वाढ केली जात आहे. या ठिकाणी गुरुत्वाकर्षण योजनेवर ही नळपाणी योजना राबवली जात आहे. त्यामुळे दर वाढविण्याची गरज नाही. त्यावर सुवर्णमध्य काढू, अशी भूमिका त्यांनी आज येथे पत्रकार परिषदेत जाहीर केली.

दरम्यान पंधरा मिनिटात नगराध्यक्षांनी शिल्लकी अर्थसंकल्पाची सभा आटोपली, हे योग्य नाही. त्यांनी सभा चालविणे, सगळ्या नगरसेवकांची मते विचारात घेणे गरजेचे होते. असेही यावेळी श्री.केसरकर म्हणाले.
श्री केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी नगरसेवक बाबू कुडतरकर, शुभांगी सुकी,भारती मोरे, दीपाली सावंत आदी उपस्थित होते. यावेळी केसरकर म्हणाले, याठिकाणी संस्थान काळापासून असलेली पाणी योजना ही गुरुत्वाकर्षण योजनेवर चालवण्यात येत आहे. त्यामुळे या ठिकाणी उंच टाक्या उभारण्याची गरज नाही. ॲटोमॅटीक पाणी लोकांपर्यंत पोहोचू शकते, त्यामुळे हे कारण पुढे करून पाणीपट्टीत करण्यात आलेली वाढ योग्य नाही, त्यावर यासंदर्भात आपण नगर विकास मंत्र्यांकडे लक्ष वेधणार, असल्याचेही यावेळी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा