You are currently viewing ‘दास्तानगोई’ने रसिक मंत्रमुग्ध

‘दास्तानगोई’ने रसिक मंत्रमुग्ध

*’दास्तानगोई’ने रसिक मंत्रमुग्ध*

पिंपरी

ना. धों. महानोर साहित्यनगरी, नवीन देहू – आळंदी रस्ता, मोशी येथे शनिवार, दिनांक १८ नोव्हेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय दुसऱ्या इंद्रायणी साहित्य संमेलनातील उद्घाटनोत्तर दुसऱ्या सत्रात ‘दास्तानगोई’ या अभिनव कलाविष्काराने रसिकांना मंत्रमुग्ध केले. संमेलनाध्यक्ष सोपान खुडे, खासदार अमोल कोल्हे, उद्घाटक डॉ. राजा दीक्षित, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ.‌सागर देशपांडे, स्वागताध्यक्ष गणेश सस्ते, इंद्रायणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष संदीप तापकीर, समन्वयक अरुण बोऱ्हाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी यांनी सादर केलेल्या या कलाविष्काराविषयी माहिती देताना अक्षय शिंपी म्हणाले की, ‘”दास्तानगोई’ हा मूळ उर्दू कलाप्रकार आहे. तेराव्या शतकात इराणमधून तो भारतात आला. लखनौ आणि कानपूर हे या कलाप्रकारातील दोन मुख्य केंद्र होते. वैविध्यपूर्ण कथांची मालिका म्हणजे ‘दास्तानगोई’ होय. सुमारे शेहेचाळीस हजार पानांची ही कथामालिका आहे. काळानुसार त्यात बदल होत गेले.” दास्तानगोईचे मराठी रूपांतर करताना ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. मोकाशी यांच्या ‘आमोद सुनाशी आले’ या आयशसंपन्न कथेचे अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी यांनी साभिनय अभिवाचन केले.

संमेलनातील तिसऱ्या सत्रात ज्येष्ठ साहित्यिक, कवी राज अहेरराव यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन संपन्न झाले. यामध्ये सुमारे पस्तीस कवींनी सहभाग घेऊन विविध आशयविषयांच्या कवितांचे प्रभावी सादरीकरण केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. पौर्णिमा कोल्हे यांनी आभार मानले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 4 =