*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”बहावा बहार”*
आयुष्यात सर्व गोष्टींचा मोदे करावा स्वीकार
नशिबाने समोर आलेले सोसावे बिनतक्रारIIधृII
जीवन कष्टप्रद तरी असावे धीर गंभीर
अशांती अतृप्तता धावणे तिथे अ-स्विकार
गतिमानता संतुलन शिकवे बहावा बहारII1II
उन्हाळा शिवरूप पावसाळा ब्रह्म रहाणार
हिवाळा विष्णू उत्पत्ती स्थिती लय साधणार
निसर्ग चक्र एक संपल्यावर नवे बनणारII2II
दुष्काळ निःशब्द निःस्तब्ध प्रदूषण सोसणार
उन्मुक्त दुर्दम्य पणे स्थितप्रज्ञ जगणार
बहावा प्रतिकूल परिस्थितीत तर्र फुलणारII3II
बहावा म्हणजे संपूर्ण निवडरहित स्वीकार
बहाव्याचे फुलासम विसरावा अहंकार
उष्णतेचा रंग लेवून मन प्रसन्न करणारII4II
मकरंद विराजमान नेसून पितांबर
उभा राहे थाटात लेऊन सुवर्णालंकार
रखरखत्या उन्हांत देई आल्हाद अलवारII5II
©️काव्य:श्री अरुण गांगल. कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.
