रामगड किल्ल्यावर होणार श्रमदान ; कोरोनाच्या नियमावलीचे पालन करून होणार कार्यक्रम
मालवण
मालवण पंचायत समितीने ऐतिहासिक स्थळांवर स्वच्छता अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा शुभारंभ रविवारी २८ फेब्रुवारी रोजी रामगड किल्ल्यावरील स्वच्छता अभियानाने करण्यात येणार आहे. मालवण पंचायत समिती आणि स्वराज्य संघटना, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनाच्या शासकीय नियमावलीचे पालन करून हा उपक्रम केला जाणार आहे.
एक सामाजिक उपक्रम म्हणून मालवण पंचायत समिती आणि स्वराज्य संघटना सिंधुदुर्ग यांच्या वतीने मालवण तालुक्यातील ऐतिहासिक स्थळांच्या साफसफाईचा उपक्रम निश्चित करण्यात आला आहे. याचा शुभारंभ रविवारी रामगड किल्ल्यावरून करण्यात येणार आहे. कोविड १९ च्या अनुषंगाने देण्यात आलेल्या निर्देशांचे पालन करून हे स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, स्वराज्य संघटना अध्यक्ष साईश माशेलकर आणि प्रथमेश वेलकर यांनी दिली आहे..