You are currently viewing कणकवलीत राणे यांचा अमृतमहोत्सवी सोहळा; राजकीय शक्तीप्रदर्शनाचा महामेळावा
Oplus_16908288

कणकवलीत राणे यांचा अमृतमहोत्सवी सोहळा; राजकीय शक्तीप्रदर्शनाचा महामेळावा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती; राज्यभरातून लाखोंची गर्दी कणकवलीकडे

कणकवली / प्रतिनिधी :

कोकणचे सुपुत्र आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील धडाडीचे नेतृत्व, माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळा’ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदला जाणार आहे.

या अभूतपूर्व सोहळ्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असून, त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

राज्याच्या राजकारणात आक्रमक आणि विकासाभिमुख नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायण राणे यांच्या सार्वजनिक जीवनाला सात दशके पूर्ण होत आहेत. कोकणातून सुरू झालेला त्यांचा प्रवास मुख्यमंत्रीपद आणि केंद्रातील कॅबिनेट मंत्रिपदापर्यंत पोहोचला असून, त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.

या ऐतिहासिक टप्प्याच्या निमित्ताने ‘खा. नारायण राणे अमृतमहोत्सवी वर्ष समिती’तर्फे कणकवलीत भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती.

राणे आणि शिंदे यांच्यातील जिव्हाळ्याचे संबंध आणि महायुतीतील त्यांचे स्थान लक्षात घेता, हा सोहळा केवळ वाढदिवसापुरता मर्यादित न राहता मोठ्या राजकीय शक्तीप्रदर्शनाचे स्वरूप धारण करणार आहे.

दरम्यान, सिंधुदुर्गसह राज्यभरातून लाखो कार्यकर्ते कणकवलीत दाखल होणार असून, संपूर्ण शहर पोस्टर, बॅनर्स आणि उत्साही वातावरणाने ‘राणेमय’ झाले आहे. प्रशासन आणि आयोजकांनी सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा