You are currently viewing लोकमहर्षी डॉ.पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न

लोकमहर्षी डॉ.पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न

मिशन आयएएसने घेतला पुढाकार

 

भारताचे पहिले कृषी मंत्री तसेच श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक व खऱ्या अर्थाने शिक्षणाची व कृषीची ज्ञानगंगा विदर्भात आणणारे शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांना मरणोत्तर भारतरत्न उपाधीने गौरविण्यात यावे यासाठी गेल्या दोन वर्षापासून डॉक्टर पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीच्या मिशन आयएएस या उपक्रमाचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी पुढाकार घेतला आहे. भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मू पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शहा त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन मिशन आय ए एस च्या वतीने दिल्लीचे प्रतिनिधी व सुप्रीम कोर्टाचे सीनियर एड.श्री के के चौधरी यांनी त्यांना रितसर लेखी निवेदन दिले आहे.

या कामी अमरावतीचे राज्यसभा सदस्य व माजी पालकमंत्री डॉ.अनिल बोंडे अमरावतीचे खासदार श्री बळवंत वानखडे

वर्धा मतदार संघाचे खासदार श्री अमर काळे यांनी या कामी पुढाकार घेतला असून डॉ. अनिल बोंडे यांनी लोकसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केलेला आहे.

 

डॉ.पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न देण्यात यावे यासाठी मराठा सेवा संघाचे संस्थापक एड. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती येथे जिजाऊ नगर मध्ये एक सभा संपन्न झाली. या सभेला दिल्लीचे एड.के के चौधरी सुप्रीम कोर्टाचे एडवोकेट श्री सिंग प्रा. अलका गायकवाड प्रा. हरिहर लुंगे प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे व श्री देशमुख हे उपस्थित होते. या सभेमध्ये डॉ.पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न देण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची आखणी करण्यात आली

 

सह्याची मोहीम

 

डॉ.पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न देण्यात यावे यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीने सह्याची मोहीम सुरू केली असून वेगळ्या क्षेत्रातील लोकांच्या लोकप्रतिनिधींच्या या प्रस्तावावर सह्या घेऊन हा प्रस्ताव भारताचे राष्ट्रपती पंतप्रधान व गृहमंत्री यांना सुपूर्द करण्यात येणार आहे.

 

मान्यवरांच्या भेटी

 

डॉ.पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न देण्यात यावे यासाठी मिशन आय ए एस.चे संस्थापक डॉ.नरेशचंद्र काठोळे यांनी सुप्रीम कोर्टाचे सिनियर एड.श्री के के चौधरी यांच्या समवेत केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांची नागपूर मुक्कामी भेट घेतली असून त्यांनी मला आपण प्रस्ताव द्या .बाकी उर्वरित बाबींच्या पाठपुरावा मी करतो. डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न देणे ही आमच्यासाठी देखील अभिमानाची बाब आहे. असे वक्तव्य केले आहे. एड. चौधरी व प्रा.काठोळे यांनी जरूड येथे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी मंत्री श्री हर्षवर्धन देशमुख यांची भेट घेऊन या प्रस्तावावर चर्चा केली आहे. त्यांनी देखील या कामी सक्रिय सहभाग नोंदविला आहे.

 

ठराव

 

डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांना भारतरत्न देण्यात यावे यासाठी श्री शिवाजी शिक्षण संस्थेने यापूर्वीच ठराव केला असून त्या ठरावाचे नूतनीकरण श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणीचे सदस्य श्री हेमंत काळमेघ यांच्या पुढाकाराने करण्यात आले. आहे. याशिवाय जबलपूर येथे केंद्रीय मंत्री श्रीमती अनुप्रिया पटेल यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या भव्य अशा अखिल भारतीय कुणबी महासभेच्या 46 व्या राष्ट्रीय अधिवेशनात 5000 लोकांच्या समोर डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न देण्यात यावे यासाठी एड.के.के. चौधरी यांनी अधिवेशनाच्या विचारपीठावरून हा ठराव मांडला व तो सर्वानुमते मंजूर झाला .या कमी डॉ. मंगेश देशमुख प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी या ठरावाला अनुमोदन दिले. डॉ. पंजाबराव देशमुख यांनी अखिल भारतीय कुणबी महासंघाचे 23 व्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले आहे तर श्रीमती विमलताई देशमुख यांनी अखिल भारतीय कुणबी महासंघाचे 25 व्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविले आहे.

 

लोकप्रतिनिधींचा पुढाकार

 

शिक्षण मा. डॉ. पंजाबराव देशमुख यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावे यासाठी महाराष्ट्रातील विशेषतः विदर्भातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

तसेच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने तसा ठराव करणे पण गरजेचे आहे .यासाठी लोक जागृती करणे गरजेचे आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख आयएएसअकादमी सातत्याने कार्यरत आहे. केंद्रीय मंत्र्यांना नियमितपणे स्मरण देणे तसेच स्वाक्षरी मोहीम राबवणे हे काम निरंतर सुरू आहे. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त एकत्र येऊन सर्वांनी हे आपले राष्ट्रीय कार्य समजून या कार्यास हातभार लावावा असे आवाहन एका प्रसिद्धी पत्रकातून करण्यात आले आहे.

 

प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे

संचालक

डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी

अमरावती कॅम्प

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा