You are currently viewing दोडामार्ग पंचायत समितीत सरपंच समितीची स्थापना

दोडामार्ग पंचायत समितीत सरपंच समितीची स्थापना

दोडामार्ग पंचायत समितीत सरपंच समितीची स्थापना

उपसभापती गणेशप्रसाद गवस यांची अध्यक्षपदी निवड; १६ सदस्यांचा समावेश

दोडामार्ग – वार्ताहर :

तालुक्यातील ग्रामविकासाला गती देण्यासाठी पंचायत समिती दोडामार्ग अंतर्गत सरपंच समितीची स्थापना करण्यात आली असून उपसभापती गणेशप्रसाद शंकर गवस यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. उपसभापती हे पदसिद्ध अध्यक्ष असतात, त्यानुसार ही निवड करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून ग्रामपातळीवरील विविध प्रश्नांवर प्रभावी तोडगा काढता येईल तसेच प्रशासन व ग्रामपंचायती यांच्यातील समन्वय अधिक बळकट होईल, असे मत गवस यांनी व्यक्त केले.
नवीन गठित सरपंच समितीत एकूण १६ सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये अनिल दत्ताराम शेटकर, छाया सखाराम धर्णे, बळीराम कृष्णा शेटये, अस्मिता अनिल गवस, सुजल सूर्यकांत गवस, हरिश्चंद्र गंगाराम नाईक, वंदना आनंद सावंत, अजित मनोहर देसाई, स्नेहा सहदेव गवस, श्रीनिवास मुकुंद शेटकर, सुरेंद्र संभाजी सावंतभोसले, श्रुती विठ्ठल देसाई, पराग महादेव गावकर, प्रकाश जयाराम कदम, देवेंद्र रामकृष्ण शेटकर यांचा समावेश आहे.
ही समिती ग्रामपातळीवरील विकासकामे, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, शिक्षण तसेच विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी यावर विशेष लक्ष केंद्रित करणार आहे. ग्रामस्थांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची जबाबदारीही समितीवर राहणार आहे. स्थानिक पातळीवर लोकसहभाग वाढवून विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने ही समिती महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या प्रसंगी पंचायत समिती सदस्य स्नेहा गवस, संजय सातार्डेकर, आदर्श गाव केरचे उपसरपंच तेजस देसाई, कोनाळ उपसरपंच रत्नकांत कर्पे, हेवाळे सरपंच साक्षी देसाई, सायली निंबाळकर, सोनिया कुबल, सभापती पावती गवस, गटविकास अधिकारी यशवंत गवस, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी जाधव यांच्यासह अनेक सरपंच उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा