*चिंतेत असलेल्या माधुरी मेस्त्री यांना साईकृपा संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे सर यांचे बहुमलाचे सहकार्य*
सिंधुदुर्ग
माधुरी मेस्त्री राहणार शेरले तालुका सावंतवाडी येथील रहिवासी आहेत.त्या १०० टक्के अंध दिव्यांग आहेत. त्यांना दिव्यांग बेघर योजनेतून घर मंजूर झालेलं असून घराच काम थोड राहिल्याने त्यांना पुढील बांधकाम करण्यासाठी सिमेंटची आवश्यकता होती. माधुरी मेस्त्री यांनी विश्वासाने साईकृपा संस्था अध्यक्ष श्री अनिल शिंगाडे यांना विनंती केली की आम्हाला घर बांधण्यासाठी सिमेंटची आवश्यकता आहे.ही माहिती साईकृपा संस्था अध्यक्ष श्री अनिल शिंगाडे यांना कळताच आणि माधुरी मेस्त्री यांच्या विनंतीला दाद देऊन त्यांनी तातडीने धाव घेऊन स्वइच्छने एक खारीचा वाटा म्हणून त्यांना पुढील बांधकामासाठी सिमेंटची दहा १०पोती स्वखर्चाने आज दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी स्वतः घरी जाऊन सिमेंटची दहा पोती त्यांना सुपूर्द केली. श्री.अनिल शिंगाडे यांनी कोणताही विचार न करता तेथे धाव घेतली व त्यांना मदतीचा हात पुढे केला. यावेळी साईकृपा संस्था अध्यक्ष श्री अनिल शिंगाडे यांनी असे आवाहन केले की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी दानशूर व्यक्तींनी अशा या गरजू दिव्यांग बांधवांसाठी एक मदतीचा हात देऊन पुढे करून सरळ हस्ते मदत करून अशा या दिव्यांग बांधवांच्या घरकुलांना आधार देऊया सावली देऊया व भक्कम बनवूया कारण असे अनेक अर्ज संस्थेकडे पेंडिंग असून त्यासाठी सरळ हस्ते मदत करा असे आवाहन करण्यात येत आहे त्याबद्दल माधुरी मेस्त्री व त्यांच्या परिवाराने साईकृपा संस्थेचे आभार मानले.
त्यावेळी साईकृपा संस्थेचे अध्यक्ष श्री अनिल शिंगाडे व सहसचिव श्री सुनील तांबे सर उपस्थित होते.
मदतीसाठी खाते नंबर –
०१६४०४०००००००४०
संपर्क आणि गुगल पे नंबर – ९७६५९७९४५०
या उपक्रमामागे गरजू व्यक्तींना आधार देण्याचा उद्देश असून समाजातील इतरांनी ही अशा प्रकारे पुढे येऊन मदतीचा हात द्यावा व आमचा हा उपक्रम यशस्वी करावा.
ही मदत केवळ साहित्य पुरती मर्यादित नसून समाजात एकमेकांना साथ देण्याची भावना आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था ही वेळोवेळी दिव्यांग बांधवांसाठी मायेचा आपुलकीचा हात देऊन त्यांचे जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न करत असते.
