*तळमळ*
तुझ्या माझ्या मध्ये फक्त,
एका श्वासाचेच अंतर,
तू सोबत रहा अथवा दूर,
तू माझी नी मी तुझाच निरंतर.
माझ्या प्रत्येक श्वासात,
धडकन तुझीच असते.
हृदयाच्या स्पंदनात,
धडधडही तुझीच असते.
उघडे असोत वा बंद डोळे,
स्वप्नही पाहतात ते तुझी.
उघड्या डोळ्यांनी पाहिलेली,
स्वप्ने खरी होतात म्हणे माझी.
आठवण येता तुझी हलकेच,
खुलते ओठांची नाजूक कळी.
गालावर माझ्या तेव्हाच पडते,
तुझ्या आठवांची गोड खळी.
वाट पाहीन तुझी मी,
कधी होईल आपली भेट.
अडवू नकोस तेव्हा मला तू,
शिरेन मी तुझ्या हृदयात थेट.
(दिपी)✒️
दीपक पटेकर
८४४६७४३१९६