You are currently viewing किल्ले पारगड व पंचक्रोशीतील रस्ता सुस्थितीत केल्याबद्दल प्रशासनाचे आभार; उर्वरित कामासाठी निधीची मागणी

किल्ले पारगड व पंचक्रोशीतील रस्ता सुस्थितीत केल्याबद्दल प्रशासनाचे आभार; उर्वरित कामासाठी निधीची मागणी

किल्ले पारगड व पंचक्रोशीतील रस्ता सुस्थितीत केल्याबद्दल प्रशासनाचे आभार; उर्वरित कामासाठी निधीची मागणी

पारगड:

किल्ले पारगड वासीय, इसापूर, मोर्ले, घाटगेवाडी, केर आणि संपूर्ण पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने प्रलंबित असलेल्या राज्य महामार्ग १८७ (मोर्ले-पारगड रस्ता) च्या सुधारणेबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले आहे. या रस्त्याचे काम सुस्थितीत केल्याबद्दल उपोषणकर्त्यांनी आणि स्थानिक रहिवाशांनी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन, स्थानिक आमदार, वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (सा.बां.) अधिकाऱ्यांचे जाहीर आभार मानले आहेत.
​प्रशासनाचे आभार आणि अभिनंदन
​ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की, “आमच्या आंदोलनाची आणि मागणीची दखल घेऊन रस्त्याचे काम मार्गी लावल्याबद्दल आम्ही संबंधित सर्व अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे शतशः ऋणी आहोत. त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस आणि पदोन्नतीस आमचे सदैव सहकार्य व शुभेच्छा राहतील.” ही प्रार्थना त्यांनी आई भवानी चरणी अर्पण केली आहे.
​१५ कोटींच्या निधीची तातडीने मंजुरी मिळावी
​रस्त्याचे पुढील काम अधिक दर्जेदार आणि जलद गतीने व्हावे, यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले आणि आमदार मा. दीपकभाई केसरकर यांनी १५ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. हा निधी तातडीने मंजूर करून रस्त्याचे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी नम्र विनंती किल्लेवासी व पंचक्रोशीतील नागरिकांनी केली आहे.
​चंदगड तालुक्यातील २ कि.मी. कामासाठी साकडे
​या संपूर्ण रस्ते विकासामध्ये आता केवळ चंदगड तालुक्याच्या हद्दीतील २ किलोमीटरचा रस्ता शिल्लक राहिला आहे. या भागातील कामात कोणतीही तांत्रिक अडचण नसल्याने, आमदार शिवाजीराव पाटील साहेबांनी पुढाकार घेऊन हा उर्वरित २ कि.मी. चा टप्पा त्वरित पूर्ण करावा, जेणेकरून पारगड परिसरातील वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
​”प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. आता केवळ उर्वरित २ कि.मी. आणि नवीन निधीचा प्रश्न मार्गी लागल्यास संपूर्ण पंचक्रोशीचा विकास वेगाने होईल.”
— किल्ले वासीय व पंचक्रोशी ग्रामस्थ

प्रतिक्रिया व्यक्त करा