You are currently viewing सावंतवाडीत नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
Oplus_16908288

सावंतवाडीत नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांची माहिती; महिला, बालकांसाठी विशेष उपक्रम आणि सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल

सावंतवाडी / (प्रतिनिधी):

कोकणचे भाग्यविधाते, माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना मोठ्या उत्साहात प्रतिसाद मिळणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त बॅ. नाथ पै सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, रुग्णांना फळ वाटप, धान्य वाटप, तसेच वृक्ष वाटपासारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यासोबतच अनाथाश्रमांना मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपली जाणार आहे.

दरम्यान, महिला आघाडीच्या माध्यमातून महिलांसाठी व लहान मुलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सांस्कृतिक कार्यक्रम, वेशभूषा स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, पत्रकार भगिनींचा सन्मान, तसेच विशेष कार्य करणाऱ्या महिला कीर्तनकारांचा गौरव केला जाणार आहे. याशिवाय पाककला स्पर्धेसह विविध कार्यक्रमांचीही आखणी करण्यात आली आहे.

या पत्रकार परिषदेस शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, महिला जिल्हाप्रमुख ॲड. नीता सावंत-कविटकर, परीक्षित मांजरेकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा