You are currently viewing अनधिकृत एलईडी मासेमारीवर कडक कारवाई करा; मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

अनधिकृत एलईडी मासेमारीवर कडक कारवाई करा; मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

तपासणी मोहिम व्यापक करण्याचे आदेश; संवेदनशील लँडींग पॉईंट्सवर सुरक्षा वाढविण्यावरही भर

मुंबई / (प्रतिनिधी):

एलईडी वापरण्याची परवानगी नसलेल्या मासेमारी बोटींवर कडक कारवाई करण्यासाठी तपासणी मोहिम व्यापक प्रमाणात राबवावी, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.

मंत्रालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस मत्स्यव्यवसाय विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. रामास्वामी एन., मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले, सहआयुक्त महेश देवरे व युवराज चौगुले आदी उपस्थित होते.

मंत्री राणे म्हणाले, एलईडी वापरण्याची परवानगी नसलेल्या मासेमारी बोटींद्वारे होणारी मासेमारी रोखण्यासाठी कठोर कारवाई आवश्यक आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी अचानक भेटी देऊन तपासणी करावी आणि जबाबदारी निश्चित करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तसेच मत्स्यव्यवसाय विभागाच्या नवीन आकृतीबंधानुसार कर्मचारी भरती प्रक्रिया, सागरी किनाऱ्यावरील ९१ अतिसंवेदनशील लँडींग पॉईंट्सवर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत सुरक्षा रक्षक व पर्यवेक्षक नेमण्याबाबत आणि प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत “सागर मित्र” नेमणुकीसंदर्भातही आढावा घेऊन संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा