You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची दमदार भरारी; ४ वर्षांत ७००० कोटींचा टप्पा पार

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची दमदार भरारी; ४ वर्षांत ७००० कोटींचा टप्पा पार

३००० कोटींची व्यवसाय वाढ; सभासद व ग्राहकांच्या विश्वासामुळे यशाचा नवा विक्रम

 

सिंधुदुर्ग :

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अल्पावधीतच उल्लेखनीय प्रगती साधत ४ वर्षांत तब्बल ३००० कोटींची व्यवसाय वाढ नोंदवली आहे. मार्च २०२६ अखेर बँकेचा एकूण व्यवसाय ७१०६ कोटींवर पोहोचला असून बँकेने ७००० कोटींचा महत्त्वपूर्ण टप्पा यशस्वीरीत्या पार केला आहे.

डिसेंबर २०२१ मध्ये बँकेचा व्यवसाय ४२७७ कोटी इतका होता. त्यानंतर सातत्यपूर्ण वाढ नोंदवत मार्च २०२२ मध्ये ४४५७ कोटी, मार्च २०२३ मध्ये ४८३८ कोटी, मार्च २०२४ मध्ये ५३९० कोटी, मार्च २०२५ मध्ये ६०९४ कोटी असा प्रवास करत मार्च २०२६ मध्ये हा आकडा ७१७६ कोटींवर जाऊन पोहोचला आहे.

बँकेच्या या यशामागे सभासद, ग्राहक, ठेवीदार तसेच हितचिंतकांचा भक्कम विश्वास आणि सहकार्य महत्त्वाचे ठरले आहे. बँकेच्या सर्व संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही उल्लेखनीय कामगिरी साध्य झाली आहे.

याबाबत अध्यक्ष मनिष दळवी व उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी सर्व सभासद, ग्राहक, ठेवीदार आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा