You are currently viewing जी. जी. उपरकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा सावंतवाडी-वेंगुर्ल्यात पाच दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन

जी. जी. उपरकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा सावंतवाडी-वेंगुर्ल्यात पाच दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन

जी. जी. उपरकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
सावंतवाडी-वेंगुर्ल्यात पाच दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन

सावंतवाडी :

शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा माजी आमदार परशुराम उर्फ (जी. जी.) उपरकर यांचा वाढदिवस १४ एप्रिल रोजी विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने सावंतवाडी व वेंगुर्ला येथे पाच दिवसांचे कार्यक्रम पदाधिकाऱ्यांकडून आयोजित करण्यात आले आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आश्रमातील मुलांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून मुलांसमवेत केक कापून वाढदिवस साजरा केला जाणार आहे. तसेच “माजी आमदार उपरकर चषक” स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील इतिहासकालीन शस्त्रांचे प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे.
याशिवाय तज्ञ डॉक्टरांमार्फत मोफत आरोग्य शिबिरे आयोजित केली जाणार असून विविध आरोग्य केंद्रांमध्ये फळवाटपाचे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमांबाबतची माहिती युवासेना तालुकाप्रमुख तथा सावंतवाडी शहर प्रवक्ते आशिष सुभेदार आणि युवा पदाधिकारी आबा चिपकर यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा