मोरगावात चव्हाटा मंदिर सभागृहाच्या कोनशिला समारंभाला उत्स्फूर्त प्रतिसाद
दोडामार्ग
मोरगाव (ता. दोडामार्ग) येथे चव्हाटा मंदिर सभागृहाच्या कोनशिला समारंभाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या समारंभास जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत मोरगाव गावातील मानकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जी. प. सदस्या सौ. साशी तळवडेकर, उपसभापती गणेशप्रसाद गवस, सरपंच संतोष आईर, दशरथ ठाकुर, शैलेश ठाकुर, संतोष ठाकुर, रमेश ठाकुर (सोसायटी चेअरमन), नदू गावकर, उदय ठाकुर, आप्पा कदम (उपसरपंच) तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चव्हाटा मंदिर सभागृह उभारणीमुळे गावातील धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांसाठी सुसज्ज सुविधा उपलब्ध होणार असून, ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.
