*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*हृदयाच्या वहीवर…..*
हृदयाच्या वहीवर
खूप काही लिहायचे
भाव मनातील अनाम
लेखणीला सांगायचे..
..
अव्यक्त रहातं मन
मिटू मिटू पहातं
कळी उमलायला
किरण शोधत बसतं…
मिटता मिटत नाही
या वहीवर लिहिलेलं
तरंग लेखणीचे उठतात
खोल तळी साठलेलं….
शब्द शब्द वेचून
रेखते बघ पानांवर
भावनांचे दवबिंदू
टपकतात झरझर…….
ह्रदयाच्या वहीवर
कल्लोळ सारा लिहिते
मिटून घेते ती वही
उशाशी घेत निजते….
🔅🔅🔅🔅🔅🔅🔅
अरुणा दुद्दलवार @✍️
