*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*दया तुमचं कोंदण*
गोठ पाटल्या मागत नाही, नकाच देऊ कंगण
माझ्या ज्वानीच्या हिऱ्याला दया तुमचं कोंदण
रुतू लागला बाजूबंद अन
तंग होते मज काचोळी
फुलून आला देह माझा
राया,आणा जरीची चोळी
गळ्यात बांधा डोरलं अन पायात चढवा पैंजण
माझ्या ज्वानीच्या हिऱ्याला दया तुमचं कोंदण
किती पाखरं येरे झार करती
सांज सकाळी दारा पुढती
मनात वरता तुम्हास राया
स्वप्ने सारी इथेच घडती
हौसेनं मी पहा रेखलं तुमच्या नावाचं गोंदण
माझ्या ज्वानीच्या हिऱ्याला दया तुमचं कोंदण
मनासारखे घर बांधू या
राजा राणी मिळून राहू
बहरून जाता प्रीतवेल
कळ्या फुलांना तिथेच पाहू
तुमच्या संगे उजळून जाईल आयुष्याचे प्रांगण
माझ्या ज्वानीच्या हिऱ्याला दया तुमचं कोंदण
श्रीनिवास गडकरी
रोहा पेण पुणे.
@ सर्व हक्क सुरक्षित
केवळ नावासहितच पुढे पाठवावे
9130861304
30.03.2026