*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
कवी आणि माशी ….!!
कवीने अखेर ठरवलं..
शेवटाची ओळ लिहून ठेवावी
पुढचा श्वास घ्यायचा
चुकून राहून… गेलाच तर
त्या पूर्वीच शेवटाची ओळ लिहून ठेवावी
कवीने पुढ्यातल कागद ओढला
लेखणी सरसावली!पण हात थबकला
नाकावर उठबस करणा-या माशीकडे
वळला
तिला बिचारीला कसलीच कल्पना
नव्हती
तिने शांतपणे कवीच्या देहावर
आपला देह टाकला..!
शेवटाच्या ओळीपूर्वीच शेवट
माशीचा झाला
कवीला या गडबडीत शेवटाची ओळ
आठवेना
कवी ..माशी सारखाच देह सैल करून …..पडून राहिला…
शेवटाची ओळ त्याला सोडून गेली
कवीला… ती लिहिता नाही आली
बिचारी माशी तिला शेवट कळला नाही
अखेर शेवटाची ओळ … कवीला ..सोडून गेली
कवी आणि माशी! दोघेही जीव
दोघांनाही शेवट कळला नाही
बाबा ठाकूर ठाकूरी उवाच
ILS..अनुवादीत..BRITISH COUNCIL..LIBRARY..
