You are currently viewing वैभववाडी धनगर समाजाला एकत्र आणणारी VDPL स्पर्धा; नवलराज काळे यांचे एकतेचे आवाहन

वैभववाडी धनगर समाजाला एकत्र आणणारी VDPL स्पर्धा; नवलराज काळे यांचे एकतेचे आवाहन

वैभववाडी धनगर समाजाला एकत्र आणणारी VDPL स्पर्धा; नवलराज काळे यांचे एकतेचे आवाहन

स्व. भरत बोडेकर युवा प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे कौतुक; युवा शक्तीला दिशा देणारा प्रयत्न

मुंबई (चेंबूर) :

वैभववाडी तालुक्यातील धनगर समाजातील युवकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने स्व. भरत बोडेकर युवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या वैभववाडी धनगर समाज प्रीमियर लीग (VDPL) स्पर्धेने सामाजिक ऐक्याचा मजबूत संदेश दिला. या स्पर्धेच्या निमित्ताने ऑल इंडिया धनगर समाज महासंघ, कोकण प्रदेश अध्यक्ष नवलराज विजयसिंह काळे यांनी युवा वर्गाला एकतेचे आणि प्रगतीचे मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना काळे यांनी प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे कौतुक करत, “शेकडो युवकांना एकत्र आणून यशस्वी स्पर्धा आयोजित करणे हे मोठे कार्य आहे,” असे सांगितले. विजयी संघांचे अभिनंदन करताना त्यांनी पराभूत संघांनी खचून न जाता अधिक मेहनतीने पुढील स्पर्धांसाठी सज्ज व्हावे, असे आवाहन केले.
“१०० जणांना मागे टाकून पुढे जाण्यापेक्षा १०० जणांना सोबत घेऊन पुढे जाणे अधिक महत्त्वाचे आहे. समाजाच्या विकासासाठी एकता आवश्यक आहे. क्रीडा, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात सर्वांनी मिळून काम केले तरच प्रगती साधता येईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला समाजसेवक प्रकाश गुरखे, सचिन हुंबे, नागेश बोडके, फाले प्रतिष्ठानचे सल्लागार विजय कोकरे, अध्यक्ष चंद्रकांत बोडेकर, अनिल कोकरे, हर्षद फाले यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा