You are currently viewing नवीन कुर्ली फोंडाघाट येथे श्री हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा होणार

नवीन कुर्ली फोंडाघाट येथे श्री हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा होणार

गुरुनाथ पिळणकर व अनंत पिळणकर यांचे भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

 

कणकवली / (प्रतिनिधी) : नवीन कुर्ली वसाहत, फोंडाघाट येथील श्री हनुमान मंदिर उत्कर्ष मंडळ, कुर्ली बाजारपेठ यांच्या वतीने गुरुवार दि. २ एप्रिल २०२६ रोजी श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहात साजरा होणार आहे.

या मंगल सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून पहाटे ५.०० ते ६.०० वाजता अभिषेक होणार आहे. त्यानंतर सकाळी ६.०० ते ७.०० या वेळेत श्री हनुमान जन्मोत्सव साजरा केला जाईल. सकाळी ७.०० ते दुपारी ८.०० या वेळेत आरती व भजन कार्यक्रम होणार आहेत.

तसेच सकाळी १०.०० ते १.०० या कालावधीत श्री सत्यनारायण महापूजा, आरती व भजन आयोजित करण्यात आले आहे. दुपारी १.०० ते ३.०० या वेळेत महाप्रसादाचे आयोजन असून सायंकाळी ७.०० ते ९.०० या वेळेत सुस्वर भजन सादर होणार आहे. रात्री १०.०० ते १२.०० या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी श्री हनुमान मंदिर उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष गुरुनाथ पिळणकर तसेच नवीन विकास समितीचे अध्यक्ष अनंत पिळणकर यांनी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन केले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा