भूतकाळ….
तू विसरलास तुझा भूतकाळ,
तर तू संपलास.
भले खाल्लेस तू चटके,
जीवनात अंतर्मनात,
यश शोधण्यास आता,
तू निवडलास भविष्यकाळ,
पण,
तू विसरलास तुझा भूतकाळ….
तर तू संपलास.
वाटा होत्या अडचणीच्या,
पायात काटे बोचत जाणाऱ्या.
भले रक्तबंबाळ झालास तू,
खाच खळग्यात,
फिरता राना वनात,
तू जगलास वर्तमानकाळ,
पण,
तू विसरलास तुझा भूतकाळ…
तर तू संपलास.
सावरलं तुला तुझ्याच नशिबाने,
गोंजारलं, कुरवाळलं प्रेमाने,
भले सुखाचा वर्षाव नाही,
सुख तुझ्या मनात,
मिळे क्षणाक्षणात,
तू उपभोगलास सुखाचा काळ,
पण,
तू विसरलास तुझा भूतकाळ…
तर तू संपलास.
तुला जपलं असेल कुणीतरी,
कधी फुलासारखं,
कुपीतील अत्तरासारखं,
भले अंगावर लेवूनी मिरवलं असेल.
गंध तुझ्या श्वासात,
गंध तुझ्या स्पर्शात,
तू जपलास गंध अनंतकाळ.
पण,
तू विसरलास तुझा भूतकाळ…
तर तू संपलास.
तू उंच भरारी घे आसमंतात,
निश्चित निर्धास्त पंख पसरुनी,
भले वेड्यावाणी फिरुनी ये.
त्या निळ्या नभात,
पांढऱ्या ढगांच्या सानिध्यात,
तू अनुभवूनी घे ती संध्याकाळ.
पण,
तू विसरलास तुझा भूतकाळ..
तर मात्र…
तू संपलास..!!
(दिपी)✒️
दीपक पटेकर
८४४६७४३१९६