You are currently viewing राम मंदिरासाठी राणे कुटुंबियांकडून दहा लाखांचा निधी…

राम मंदिरासाठी राणे कुटुंबियांकडून दहा लाखांचा निधी…

ओरोस
आयोध्या येथे प्रभु श्री रामाचे भव्य मंदिर निर्माण होत आहे. या मंदिरासाठी भाजपा नेते राज्यसभा खासदार नारायण राणे यांच्या कुटुंबियांच्यावतीने १० लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
अयोध्या येथे प्रभू श्री राम यांची जन्मभूमी आहे. या ठिकाणी असलेले मंदिर सुमारे ५०० वर्षापूर्वी पाढण्यात आले होते. ५०० वर्षांच्या अथक प्रयत्नांनी आता या ठिकाणी प्रत्यक्ष भव्य मंदिर होत आहे. या मंदिर निर्माणासाठी १५ जानेवारीपासून संपूर्ण देशभर निधी समर्पण आणि जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हे अभियान राबविण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक कुटुंबात पर्यंत पोचून प्रभुराम यांच्या मंदिरासाठी प्रत्येक व्यक्तीचा हातभार लागावा यासाठी श्री राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्ट च्या माध्यमातून कार्यकर्ते फिरत आहेत. आयोध्या मध्ये होत असलेल्या प्रभू रामचंद्रांच्या मंदिरासाठी भाजपा नेते खासदार नारायण राणे यांनी आपल्या कुटुंबियांच्या वतीने १० लाख रुपये निधीचे समर्पण बुधवारी केले. सौ निलमताई राणे यांच्या हस्ते १० लाख रुपयांचा धनादेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सिंधुदुर्ग जिल्हा संघचालक रविकांत मराठे आणि श्री राम मंदिर निधी समर्पण अभियान जिल्हा सहसंयोजक लवू म्हाडेश्वर यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली, डॉ. मिलिंद कुलकर्णी, प्रकाश मोर्ये आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा