You are currently viewing दोडामार्गच्या लेकीची भरारी!

दोडामार्गच्या लेकीची भरारी!

दोडामार्गच्या लेकीची भरारी! शिल्पा खोत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी

(पूर्वाश्रमीची शिल्पा मनोहर प्रसादी) यांची निवड; दोडामार्गकरांकडून आनंद व्यक्त, अभिनंदनाचा वर्षाव

दोडामार्ग

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) शहरातील बाजारपेठ परिसरातील लेक म्हणून ओळख असलेल्या सौ. शिल्पा शशिकांत खोत (पूर्वाश्रमीची शिल्पा मनोहर प्रसादी) यांची नुकतीच कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे दोडामार्ग शहरासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिल्पा खोत यांनी आपल्या कार्यक्षमतेच्या जोरावर आणि सातत्यपूर्ण सामाजिक व राजकीय कार्यातून ही उंच भरारी घेतली आहे. त्यांच्या निवडीमुळे कोकणातील महिलांसाठीही प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे.
दोडामार्ग शहरवासीयांनी त्यांच्या या यशाबद्दल अभिमान व्यक्त करत अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. त्यांच्या पुढील कार्यकाळात जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्या महत्त्वपूर्ण योगदान देतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा