You are currently viewing देवगडमध्ये नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन

देवगडमध्ये नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन

देवगडमध्ये नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन

देवगड

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार Narayan Rane यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त देवगड मंडल भाजपच्या वतीने येत्या ५ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता इको व्हील ग्रुप सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती तालुकाध्यक्ष राजा भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला भाजपा सरचिटणीस योगेश चांदोस्कर, तालुका उपाध्यक्ष उल्हास मणचेकर, युवा मोर्चा देवगड-जामसंडे शहराध्यक्ष दयानंद पाटील, अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष सर्फराज शेख तसेच सुरेंद्र चव्हाण उपस्थित होते.
इको व्हील ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही सायकल रॅली दोन गटांमध्ये पार पडणार आहे. यामध्ये १२ वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय गट आणि सर्वांसाठी खुला गट असा समावेश करण्यात आला आहे. शालेय गटासाठी ११ किलोमीटर अंतर ठेवण्यात आले असून खुल्या गटासाठी २५ किलोमीटरचे अंतर निश्चित करण्यात आले आहे.
शालेय गटाची रॅली जामसंडे भाजपा कार्यालय–कुणकेश्वर–जामसंडे भाजपा कार्यालय या मार्गावरून काढण्यात येणार आहे. तर खुल्या गटाची रॅली जामसंडे भाजपा कार्यालय–कातवण पेट्रोल पंप–जामसंडे भाजपा कार्यालय या मार्गावरून पार पडणार आहे.
या सायकल रॅलीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक सायकलस्वारासाठी हेल्मेट बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच रॅली पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकांना मोफत टी-शर्ट, मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा