You are currently viewing पुण्यात ढगफुटीसदृश पावसाचा कहर

पुण्यात ढगफुटीसदृश पावसाचा कहर

पुण्यात ढगफुटीसदृश पावसाचा कहर; गारांसह वादळाचा तडाखा, उकाड्यानंतर वातावरण आल्हाददायक

पुणे :

शहरात आज अचानक ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण होत जोरदार गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळला. जवळपास तीन तास सुरू असलेल्या या पावसाने नागरिकांची तारांबळ उडवली. वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात गारांचा मारा झाल्याने अनेक ठिकाणी वाहनांच्या काचा फुटल्याच्या घटना घडल्या.
गेल्या दोन दिवसांपासून तापमान ४० अंशांच्या आसपास पोहोचल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. रस्ते ओस पडलेले दिसत होते. मात्र आज अचानक आलेल्या पावसाने वातावरणात मोठा बदल घडवून आणला. कोकणातील पावसासारखा अनुभव देणारा हा पाऊस पुणेकरांसाठी वेगळाच ठरला.
वादळ, गडगडाट, मुसळधार पाऊस आणि गारांचा एकत्रित असा त्रिवेणी संगम अनुभवायला मिळाल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. काही भागांत वाऱ्याचा वेगही प्रचंड असल्याने झाडांच्या फांद्या तुटल्याच्या घटना समोर आल्या.
दरम्यान, पुण्यात आलेले अजित नाडकर्णी यांनीही या अनोख्या हवामानाचा अनुभव घेतला. उकाड्यानंतर आलेल्या या पावसामुळे शहराचे वातावरण मात्र सुखद आणि आल्हाददायक झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा