You are currently viewing थांबवी हे समर आता

थांबवी हे समर आता

*ज्येष्ठ कवी मोहन मराठे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*”थांबवी हे समर आता”*

 

हे “युद्ध” आता थांबवी रे

उठ तू दयाघना

नेत्री अश्रू आणूनी मी,

करितो तुज ही प्रार्थना. /१/

 

माणसानै माणसाशी,

स्वार्थ येथे साधला

आग ओकूनी, शस्त्र आली

काय होती यातना. /२/

 

विश्व सारे आज येथे

भयभीत आहे “केशवा”

सुबुद्धी च्या “वेणू नादे ”

डोलवी”नर जीवना”. /३/

 

षड्रिपूंचा” स्पर्श आहे

आज येथे जाहला

युद्ध घडवूनी काय केले

साध्य तू विचारी मना. /४/

 

थांबवी हे “समर” आता

थांबवी “संहार” हा

नेत्री अश्रू आणूनी मी

करितो तुज ही प्रार्थना /५/

 

तप्त ऐशा वसुंधरेला

तोषवी “शित गारवा”

मानवाच्या या मतीला

तोषवी तू वामना. /६/

 

नेत्री अश्रू आणूनी मी

करितो तुज ही प्रार्थना…….

 

 

रचना:– मोहन मराठे..

 

सर्वांचं अस्तित्व नष्ट करणारे हे युद्ध हे परमेश्वरा आता थांबू दे…. युद्ध कर्त्यांना मानवतेची, प्राणीमात्रांची कीव येऊ दे…..या पृथ्वी मातेच्या पोटावर होणारे दाहक घाव शांत होऊ दे……

प्रतिक्रिया व्यक्त करा