You are currently viewing कणकवली येथे प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

कणकवली येथे प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

कणकवली येथे प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन 

सिंधुदुर्गनगरी

जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटरसिंधुदुर्ग आणि कणकवली कॉलेजकणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३० मार्च २०२५ रोजी कणकवली कॉलेज, कणकवली येथे प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. ही एक उत्तम रोजगार संधी असून स्थनिक युवक-युवतींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी अमिन तडवी यांनी केले आहे.

 

या प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत मल्टी टास्किंग स्टाफ या पदासाठी एकूण १३ जागा उपलब्ध आहेत. या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार पात्र राहणार आहेत.

प्लेसमेंट ड्राइव्ह प्रत्यक्ष मुलाखतीने कणकली कॉलेज, कणकवली ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग येथे असून सर्व इच्छुक उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांसह दि. ३० मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजता उपस्थितीत राहावे. अधिक माहितीसाठी ई-मेलSindhudurgrojgar@Gmil.com किंवा 02362-228835 या दूरध्वनीवर संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा