You are currently viewing हुमरमळा (वालावल) गावात विकासकामांचा धडाका

हुमरमळा (वालावल) गावात विकासकामांचा धडाका

अतुल बंगे यांच्या नेतृत्वाखाली विविध कामांना प्रारंभ; ग्रामपंचायतीचा पारदर्शक कारभार अधोरेखित

कुडाळ / (प्रतिनिधी) :

हुमरमळा (वालावल) गावात रामनवमी उत्सवाचे औचित्य साधून विविध विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. मा. पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीमार्फत मोठ्या प्रमाणात विकासनिधी उपलब्ध करून देत पाच महत्त्वाच्या कामांना सुरुवात करण्यात आली.

यावेळी पंचायत समिती सदस्या सौ. अर्चना बंगे, सरपंच अमृत देसाई, उपसरपंच सौ. रश्मी वालावलकर, सौ. संजना गुंजकर, सौ. हेमांगी कद्रेकर आणि श्री मितेश वालावलकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले.

या विकासकामांमध्ये हुमरमळा पारकरवाडी पायवाट, पारकरवाडी गणेश घाट, श्री रामेश्वर मंदिराकडून रस्ता व गटर बांधकाम तसेच पडोसवाडी येथील गणेश घाट सुशोभीकरण अशा कामांचा समावेश आहे. ग्रामअधिकारी श्रीमती अपर्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीचा पारदर्शक व सुयोग्य कारभार सुरू असून गावात विकासाची गती कायम असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

भूमिपूजन कार्यक्रमावेळी पंचायत समिती सदस्या सौ. अर्चना बंगे, सरपंच अमृत देसाई, उपसरपंच सौ. रश्मी वालावलकर, ग्रामपंचायत सदस्या सौ. हेमांगी कद्रेकर, सौ. संजना गुंजकर, सदस्य श्री मितेश वालावलकर तसेच माजी सदस्य कांता माड्ये, प्रभाकर गुंजकर, हेमंत कद्रेकर, नरो पेडणेकर, शानो परकर, दिनेश परकर, भिवा गुंजकर, ओमकार गुंजकर, सुजाता गुंजकर, गुरु परब, सागर परकर, पोलीस पाटील उमेश शृंगारे, हेमंत केसरकर, जितू सावंत, पंकज माड्ये, पप्पू दळवी, विजय कानडे, दादा परकर, लक्ष्मण खरात, सुलभा गुंजकर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमामुळे गावातील मूलभूत सुविधा अधिक सक्षम होणार असून ग्रामविकासाला नवे बळ मिळणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा