You are currently viewing सामाजिक बांधिलकीच्या रुग्णवाहिकेसाठी ५० हजारांची देणगी

सामाजिक बांधिलकीच्या रुग्णवाहिकेसाठी ५० हजारांची देणगी

सामाजिक बांधिलकीच्या रुग्णवाहिकेसाठी ५० हजारांची देणगी

कॅथॉलिक अर्बन सोसायटी व स्वामी भक्ताची मदत; दहा दिवसांत रुग्णवाहिका सेवेत दाखल होणार

सावंतवाडी :

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिका उपक्रमासाठी कॅथॉलिक अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, सावंतवाडी तसेच एका स्वामी भक्ताकडून प्रत्येकी २५ हजार रुपये अशी एकूण ५० हजार रुपयांची देणगी प्राप्त झाली आहे.
सोसायटीच्या चेअरमन श्रीमती आनमारी डिसोजा, व्हाइस चेअरमन पिटर दिमा, सेक्रेटरी मार्टिन आल्मेडा तसेच जनरल मॅनेजर जेम्स बोर्जिस यांनी २५ हजार रुपयांचा धनादेश सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडे सुपूर्त केला. त्याचप्रमाणे एका स्वामी भक्तानेही या सेवाभावी उपक्रमासाठी २५ हजार रुपयांची मदत दिली.
या देणगीबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष संजय पेडणेकर व रवी जाधव यांनी सर्व दात्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान ही एक सेवाभावी संस्था असून “सामाजिक कार्याचा निर्धार, जनसामान्यांचा आधार” हे संस्थेचे ब्रीदवाक्य आहे. या ब्रीदवाक्यानुसार संस्था विविध सामाजिक उपक्रमांद्वारे गरजूंपर्यंत मदत पोहोचवत आहे.
दरम्यान, रुग्णांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आलेल्या रुग्णवाहिका उपक्रमाला दात्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या दहा दिवसांत ही रुग्णवाहिका सेवेत दाखल होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सतीश तसेच उपाध्यक्ष शैलेश नाईक यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा