You are currently viewing कणकवलीतील बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी खून प्रकरण; मुकादम अमर कदम पोलिसांच्या ताब्यात

कणकवलीतील बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी खून प्रकरण; मुकादम अमर कदम पोलिसांच्या ताब्यात

कणकवलीतील बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी खून प्रकरण; मुकादम अमर कदम पोलिसांच्या ताब्यात

शिकारीदरम्यान गोळीबाराची घटना; खुनामागील कारण अद्याप अस्पष्ट, दोघांसह तिघांना ताब्यात

कणकवली :

कणकवली येथील प्रतिथयश बांधकाम व्यवसायिक सुशांत दळवी यांच्या खून प्रकरणी पोलिसांनी वेगाने हालचाली करत त्यांच्या मुकादम अमर सत्यवान कदम (वय 21, ओरोस-डोंगरेवाडी) याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा विविध अंगांनी तपास सुरू असून सध्या संशयिताची कसून चौकशी सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सुशांत दळवी आणि अमर कदम हे गुरुवारी रात्री शिकारीसाठी गेले होते. त्याचवेळी काही कारणावरून अमर कदम याने सुशांत दळवी यांच्यावर गोळी झाडल्याचे पोलिस तपासात समोर येत आहे. मात्र या खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, पोलिसांनी या घटनेत वापरण्यात आलेले गावठी कट्ट्यासदृश्य हत्यार हस्तगत केले असून या प्रकरणात अमर कदम याच्यासह त्याचे आणखी दोन साथीदार पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुढील तपास सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा