माटणे ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित उपसरपंच सागर गवस यांचा सत्कार
दोडामार्ग
दोडामार्ग तालुक्यातील माटणे गावचे नवनिर्वाचित उपसरपंच श्री सागर गवस यांचा हार व शाल देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी दोडामार्ग पंचायत समितीचे उपसभापती श्री गणेशप्रसाद गवस यांनी सागर गवस यांचे अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपतालुकाप्रमुख श्री बबलु पांगम, युवासेना तालुकाप्रमुख कु. भगवान गवस, मणेरी विभागप्रमुख श्री रामदास मेस्री तसेच कार्यालयप्रमुख श्री गुरुदास सावंत हे उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी सागर गवस यांच्या निवडीचे स्वागत करत गावाच्या विकासासाठी त्यांच्या कार्यकाळात चांगले काम होईल, असा विश्वास व्यक्त केला.
