वेंगुर्ले
ठाकर आदिवासी समाजाची वारली चित्रकथी कला व कळसुत्री बाहुल्या ही काळाच्या ओघात लोप पावत चाललेली पारंपरिक लोककला जिवंत ठेवण्यासाठी गेली पन्नास वर्षे तीचे जतन करण्यासाठी प्रयत्न करणारे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र श्री.परशुराम गंगावणे यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्याना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. श्री परशुराम गंगावणे यांना पद्मश्री पुरस्कार मिळाले बद्दल आनंदयात्री वाङमय मंडळ व श्री देवी सातेरी प्रासादिक संघ,वेंगुर्ले यांच्या वतीने पिंगुळी गुढीपूर येथे त्यांचा सत्कार करण्यात आला.

