You are currently viewing वसंतोत्सव चैत्रांगण
Oplus_16908288

वसंतोत्सव चैत्रांगण

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री कला शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम लेख*

 

*वसंतोत्सव चैत्रांगण*

 

उत्साहवर्धक नवचैतन्याने सळसळणारा वसंत ऋतू म्हणजे आनंदाची पर्वणीच. त्यामध्ये आणखी भर घालणारे चैत्रान्गण, चैत्रगौरीचे आगमनआणि त्या स्वागतासाठी लागणारी गृहिणीची धावपळ तो आनंदोत्सव साजरा करण्यासाठी तिच्या मनाची घालमेल, उत्साह सारेच अवर्णनीय. कारण कोणताही सणवार असला म्हणजे तशी घरात सार्यान्चीच धावपळ चालू असते आणि त्यातल्यात्यात गृहलक्ष्मीला जरा जास्तच धावपळ करावी लागते.

पहाटे च्या वेळी थोडा गार वार सुटलेला असतो,गावाकडच्या दृश्यात अशा वासन्तिक किंवा कोणत्याही सणवारान्चे जरा अधिक उत्साहाने नैसर्गिक वातावरणात सुंदर स्वागत होत असते. घरातल्या सार्यांच्या गडबडीत गृहलक्ष्मी मात्र जराही उसन्त न घेता लगबगीने तिची कामे आवरत असते. शुभप्राचीच्या मन्द आम्रकुसुमान्च्या सुगंधी वातावरणात कोकिळेच्या मधुर आलापात ही लक्ष्मी चैत्रगौरीच्या स्वागतासाठी आपले अन्गण स्वच्छ करुन सडासारवण करुन सजविण्याच्या मागे लागलेली असते. लहानपण आठवले, आईची लगबग चाललेली असायची, आम्ही तिला मदत करायचो़. आठवणीनी डोळे भरुन येतात.

अन्गण, दारे, उम्बरठे सजवले जायचे, पानाफुलान्च्या डहाळ्यानी तोरणे, झुम्बर लावायचे, आईने विणलेली वेगवेगळी तोरणे प्रत्येक दारावर लावली जायची. अन्गण मोठ्ठे होते, रान्गोळी काढायला भरपूर जागा असायची. आईबरोबर आम्ही छान चिन्हान्च्या रान्गोळ्या काढून त्यात सुंदर रन्ग भरत असू. त्यामध्ये सान्स़कृतिक रान्गोळ्याना महत्वाचे

स्थान असे.

५१ ते ६४ शुभचिन्हे असायची

आता अगदी सर्वच आठवत नाहीत, पण आठवतात तेवढी लिहिते.

सूर्य, चन्द्र, स्वस्तिक, आम्रपर्णी, श्रीफळयुक्त कलश, तुळशीवृन्दावन, दीप, निरान्जन, पणती, समई, लामणदिवा, कर्पुरारती, उदबत्तीचे तबक, पुष्पाचे तबक, परडी, वाजविण्याची घण्टी, शन्ख, विविध कमळे, ज्ञानकमळ, कल्पवृक्ष गोपद्म,गोवत्सधेनू,मध्य भागी मन्दिर,सजवलेली पालखी, पाळणा, झोपाळा, बासरी, मोरपीस, तोरण, त्रिशूळ, आयुधे, धनुष्यबाण,ध्वज, पन्खा,सिंहासन, देव्हारा,स्वस्तिक, फुले,वेण्या, गजरे, हार, वेली,चान्दण्या,

कासव, सजवलेलेअश्व, हत्ती, लेखणी, वही,चन्दन,हळद, कुन्कू, अक्षता,पन्चपाळे, , फणी, फुले, वेणी, खण, नारळ, ओटी, देवीच्या शृंगारसाजासाठी लागणार्या वस्तू,

अलन्काराचे प्रकार, हार, कर्णफुले, बान्गड्या, पाटल्या, तोडे, तन्मणी, कर्णफुले, बिन्दी, मुकुट,नथ, कानावरचे वेल,कमरमेखला, पैन्जण

पाट, चौरन्ग, आसन वगैरे जेवढे देवीच्या स्वागतिसाठी लागेल ते

छान, सुबक, बारीक रान्गोळीने काढून सुंदर रन्ग भरुन त्यावर थोडी चमकी टाकून सुंदर सजावट करायची.

याला वेळ लागायचा, पण चैत्रगौरी आनंदाने घरात प्रवेश करेल

पावित्र्य मान्गल्याचे प्रतीक, आनंद, ऐश्वर्य, सुख, शान्ती, समाधान मिळावे. सर्व कुटुंब आनंदी रहावे हा उद्देश तर असायचाच. पण आजूबाजुचे, परिसराचे वातावरणही आनंदी व्हायचे.

कारण पूर्ण दिवस त्यासरबराईत जायचा.

सम्पुर्ण घरात सुंदर, सुवासिक, परिमळ पसरायचा सुगंधी फुले आम्ही आणायचो, देवपूजा, आरती नैवैद्य सार साग्रसन्गीत असायचे. आईवडिल दोघांना ही धार्मिकतेची

आवड आसल्याने खूप छान समाधानी वातावरणात चैत़्रगौरीचे हळदीकुंकू व्हायचे.

कैरीचे सुगंधी आम्बटगोड पन्हे, वाटलीकैरीडाळ तर सर्वांच्या आवडीचे.

 

आता हा झाला चैत्रान्गण सजविण्याचा सोहळा, परंतु या कोणत्याही सणामागे धार्मिक विधी आणि शास्त्रीय उद्देश असायचा. पूर्वजानी अशा अनेक रितीरिवाज, रुढी आपल्याला घालून दिले आहेत, त्या प्रत्येक गोष्टी मागे शास्त्रीय कारण आणि कुटुंब व्यवस्था व समाजव्यवस्था एकत्रित येण्याचा मुख्य आणि अतिशय प्रभावी असा उद्देश असायचा.

सुसंस्कृत पणा, सामंजस्य, एकोपा टिकवून समाजाने एकत्र येणे, आनंदोत्सव साजरा करण्याच्या पवित्र भावना त्यात होत्या. त्या निमित्ताने स्त्रिया, मुली यांना ही आनंदाने सजायला, वावरायला, बोलायला मिळायचे.

हळदीकुंकवामुळे घरातील देवीची कृपा ही रहायची, प्रसन्नता, पावित्र्य, मान्गल्य, जपले जायचे, वातावरण प्रसन्न, आनंदी असायचे.

 

आता जरी काळ नाही, गरजेनुसार माणसान्च्या सवयी बदलल्या तरी हळुवार, अलगदपणे आपल्या या पूर्वजानी ठरविलेल्या सांस्कृतिक रुढी आपण जपू शकतो, आपल्या नवीन पिढीस त्याचे योग्य ते औचित्य, महत्त्व आपण नक्कीच समजावून देऊ शकतो.

 

 

अशाच आपले सण, उत्सव, परम्परा याची माहिती आपल्या पुढील पिढीला आपण नक्कीच देऊ शकतो.

 

वसन्तोत्सवी चैत्रान्गण हे

सजू दे दारी

नव्या पिढीला देऊ आपण

नवी उभारी

नको मनात शन्का सार्या

त्या माघारी

आपणच देऊ नवागताना

सन्स्कृतीची तिजोरी.

💐💐💐💐💐💐💐💐

 

 

स्वप्नगन्धा सतीश आम्बेतकर

कलाशिक्षिका.

प्रतिक्रिया व्यक्त करा