*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*श्रीस्वामी समर्थ काव्यवंदना*
।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।
_________________________
श्री संचारेश्वर स्वामी मुक्त संचारी योगी
स्वामींचे नसे वास्तव्य कधी एका जागी
कुठे रहाती, कधी खाती-पिती,उपाशी रहाती
स्वैरपणाने स्वामी कुठेही कधीही फिरती ।।
मोहोळ मुक्काम सोडुनी स्वामी निघाले
सोलापुरी शिवराय महाराज मठात आले
परिसरातील लोक देवदर्शनास येऊ लागले
मामलेदार टोळांनी स्वामी बसलेले पाहीले ।।
टोळांनी मनात स्वतःशी शब्द जे बोलले
ते स्वामींना न बोलताही अचूक समजले
म्हणाले ते- कोण आम्ही ? तुला काय करायचे ?
स्वामींना कसे समजले ? टोळ आश्चर्य करू लागले ।।
त्यास स्वामी म्हणाले,असू आम्ही मनकावडे
त्याच्याशी तुला रे काय करायचे ?
टोळ मामलेदाराला स्वामींची प्रचिती आली
त्यांनी स्वामींना घरी येण्याची विनंती केली ।।
टोळ मामलेदाराला अचानक आठवण झाली
गोपालबुवांच्या पत्रातील ओळ आठवली
सत्पुरुषाची होईल भेट,घडेल सहवास ही
आली असावी वेळ तीच ,स्वामी कृपेची ।।
_________________________
करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास
__________________________
कवी अरुणदास ” अरुण वि.देशपांडे-पुणे.
___________________________
