सुदैवाने जीवितहानी नाही; मणेरी ते वेंगुर्ला पाईपलाईनचे काम करताना प्रकार…
बांदा
मणेरी ते वेंगुर्ला या पाईपलाईनचे काम करणारी क्रेन बांदा तेरेखोल नदीपात्रात उलटून अपघात झाला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. ही घटना रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. अपघाताची माहिती मिळताच बांदा येथील ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेत मदत कार्य केले.
याबाबत अधिक महिती अशी की, मंगळवारी बांदा-आळवाडा येथे रात्री दहाच्या सुमारास काँक्रीटचे काम क्रेनच्या साहाय्याने सुरु होते. रात्रीच्या वेळी ऑपरेटरला अंदाज न आल्याने क्रेन तेरेखोल नदीपात्रात उलटली. अपघाताच्या आवाजानंतर बांदा ग्रामस्थांनी तेथे धाव घेत मदतकार्य केले. किरकोळ दुखापत वगळता कोणालाही सुदैवाने मोठी दुखापत झाली नाही. तर रात्रीच्या वेळी जोखमीचे काम करत असताना किमान आवश्यक तेवढी लाईट वापरा, असे खडे बोल उपस्थितांनी तेथील कामगारांना सुनावले. तर अशा पद्धतीने जीवावर बेतेल अशी कामे रात्रीच्या वेळी करू नका, अशी विनंती ग्रामस्थांनी केली.