You are currently viewing गैरहजर अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा; सभापती सिद्धेश रावराणे यांचा कडक इशारा
Oplus_16908288

गैरहजर अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा; सभापती सिद्धेश रावराणे यांचा कडक इशारा

पंचायत समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांची दांडी; ८ दिवसांत स्पष्टीकरण देण्याचे आदेश, सदस्यांचा संताप व्यक्त

वैभववाडी / प्रतिनिधी :

वैभववाडी पंचायत समितीच्या पहिल्याच मासिक सभेत अधिकाऱ्यांची अनुपस्थिती ठळकपणे समोर आल्याने सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पंचायत समिती अंतर्गत खात्याचे खातेप्रमुख उपस्थित होते, मात्र इतर विभागांचे अधिकारी गैरहजर असल्याने सभेतील कामकाजावर परिणाम झाल्याचे दिसून आले.

या पार्श्वभूमीवर सदस्य मंगेश लोके यांनी अनुपस्थित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. संबंधित अधिकाऱ्यांची आठ दिवसांत बैठक घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

यावर सभापती सिद्धेश रावराणे यांनी कठोर भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस काढण्याचे आदेश दिले. तसेच आठ दिवसांच्या आत स्पष्टीकरण सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

या निर्णयामुळे पंचायत समिती प्रशासनाला कडक संदेश देण्यात आला असून, भविष्यात अशा प्रकारची निष्काळजीपणा सहन केला जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा