You are currently viewing जिल्ह्यात 25 ते 26 मार्च या कालावधीत यलो अलर्ट

जिल्ह्यात 25 ते 26 मार्च या कालावधीत यलो अलर्ट

जिल्ह्यात 25 ते 26 मार्च या कालावधीत यलो अलर्ट

या कालावधीत नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी 

जिल्ह्यात २५ ते २६ मार्च २०२६ या कालावधीत यलो अलर्ट देण्यात आहे. या कालावधीत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची व विजा चमकण्याची आणि ३० ते ४० किमी प्रतीतास वेगाने सोसाट्याचा वारे वाहण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी  मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.

या कालावधीत विजा चमकत असताना पुढीलप्रमाणे दक्षता घेण्यात यावी

(१)  विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्त्रोतांपासून अलग करून ठेवावीत.

(२)  दूरध्वनी, भ्रमणध्वनीचा वापर टाळावा.

(३)  विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.

(४)विजेच्या खांबांपासून लांब रहावे.

(५) विजा चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये.

(६)  विजा चमकत असताना एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे.

(७)  धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात.

(८) वीज पडण्याची पूर्वसूचना मिळण्याकरिता आपल्या मोबाईल वर ‘दामिनी APP’ डाऊनलोड करून घ्यावे.

(९)  पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास नागरिकांनी झाडाखाली उभे राहू नये, मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक  वस्तूंपासून दुर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा.

(१०)          कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.

 

अ.क्र. नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग (०२३६२)२२८८४७ किंवा टोल फ्री १०७७

७४९८०६७८३५

जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष (०२३६२)२२८६१४ / ८२७५७७६२१३

पोलीस विभाग टोल फ्री हेल्पलाईन – ११२

जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग (०२३६२)२२८९०१
महावितरण, सिंधुदुर्ग नियंत्रण कक्ष ७८७५७६५०१९
दोडामार्ग तालुका नियंत्रण कक्ष (०२३६३)२५६५१८ /७५५८६७३४६८
सावंतवाडी तालुका नियंत्रण कक्ष (०२३६३)२७२०२८/९४२०९१४५२४
वेंगुर्ला तालुका नियंत्रण कक्ष (०२३६६)२६२०५३/९४२०८५१८०५
कुडाळ तालुका नियंत्रण कक्ष (०२३६२)२२२५२५ / ८२७५२२३१४२

 

मालवण तालुका नियंत्रण कक्ष (०२३६५)२५२०४५/९४०५४४९३७०
१० कणकवली तालुका नियंत्रण कक्ष (०२३६७)२३२०२५/९४२२७४५९०६
११ देवगड तालुका नियंत्रण कक्ष (०२३६४)२६२२०४/८८५७८३७२०४
१२ वैभववाडी तालुका नियंत्रण कक्ष (०२३६७)२३७२३९/८८३०४६२१८२

 

हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या https://mausam.imd.gov.in//  या संकेतस्थळावरून घ्या. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. कुठल्याही मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सूत्रांकडून करून घ्या किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष (०२३६२)२२८८४७ किंवा टोल फ्री १०७७ किंवा पोलीस हेल्पलाईन क्रमांक ११२ वर संपर्क करा. हवामान विभागाकडून दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या जीवित व मालमत्तेची काळजी घ्यावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा