*ज्येष्ठ साहित्यिक मोहन मराठे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*” ग्राम रक्षक अधिपती “*
नवसाला पावणारा, हाकेला धावणारा
श्री उपरलकर देव माझा. /धृ/
ग्रामे रक्षी तो,तीनशे पासष्ट
कळी काळाचा, इलाज स्पष्ट
कधी न चाले,भ्रष्टा भ्रष्ट
संस्थानिक “राजांचा राजा ” /१/ धृ
जेव्हा होते,मती कुंठित
दु:ख समस्या,मन आक्रंदित
सैरभैर मन,सुखाशी वंचित
हृदयापासून गर्जा. /२/ धृ
उच्च निच,नसे भेदभाव
जया ठायी वसतो,बुद्धीचा अभाव
तयांसी दावी दंड प्रभाव
तो हा खचित देव माझा /३/ धृ
शेष छत्र अन्,पटका साधा
घोंगडी लेवून,शोभे खांदा
सुती धोतर आणिक कुर्ता
भेदक तरीही,दयार्द्र राजा /४/ धृ
मोह न ठेविता,गुंफिले पुष्प
श्रद्धा भक्ती चा त्यात सुगंध
आज ओवाळितो,देह पंचारत
मी दास आजन्म त्याचा /५/ धृ
रचना:– मोहन मराठे
