You are currently viewing माजी आम. वैभव नाईक यांचा वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
Oplus_16908288

माजी आम. वैभव नाईक यांचा वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

कुडाळ :

माजी आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस गुरुवार, दि. २६ मार्च रोजी असून, त्यानिमित्त कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमांअंतर्गत मांडकुली शाखेच्या वतीने २१ मार्च रोजी तिरंगी डबलबारी भजनाचा जंगी सामना पार पडला. २४ मार्च रोजी कणकवली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवार, दि. २५ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या संकल्पनेतून कुडाळ शहरात रिक्षा चालकांसाठी एक लाख रुपयांचा विमा उतरविण्याचा उपक्रम राबविण्यात येणार असून जेष्ठ शिवसैनिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजता मालवण येथे सुप्रसिद्ध रोंबाट कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

आचरा विभागामार्फत चिंदर सातेरी मंदिर येथे जेष्ठ नागरिक व मान्यवरांचा सत्कार समारंभ तसेच कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, नेरूर यांचा पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला आहे.

गुरुवार, दि. २६ मार्च रोजी रामनवमी आणि वाढदिवसानिमित्त माणगाव येथे सरबत वाटप, ओरोस विभागात आनंदाश्रय येथे शिधा वाटप, तसेच झाराप येथे जीवदान विशेष शाळेतील विद्यार्थ्यांना शिधा व खाऊ वाटपाचे कार्यक्रम होणार आहेत.

माजी आम. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्याचा संदेश देण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा