You are currently viewing व्यवहार करताना सावधानता बाळगा- तहसीलदार-सुर्यकांत पाटील

व्यवहार करताना सावधानता बाळगा- तहसीलदार-सुर्यकांत पाटील

*व्यवहार करताना सावधानता बाळगा-* तहसीलदार-सुर्यकांत पाटील

वैभववाडी तहसील कार्यालयात ४४ वा जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा

वैभववाडी

वस्तु-सेवा खरेदी करताना अगर कोणताही व्यवहार करताना ग्राहक म्हणून सावधानता बाळगणे आवश्यक आहे. फसवणूक होऊ नये म्हणून काळजी घ्यावी. त्यातुनही फसवणूक झाल्यास
संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा असे आवाहन वैभववाडीचे तहसीलदार श्री. सुर्यकांत पाटील यांनी केले. तहसील कार्यालय वैभववाडी आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र वैभववाडी तालुका शाखेच्या संयुक्त विद्यमाने दि.२३ मार्च रोजी तहसील कार्यालयात आयोजित केलेल्या जागतिक ग्राहक दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या माध्यमातून तालुक्यासह जिल्ह्यात सुरू असलेले ग्राहक जागृतीचे कार्य उल्लेखनीय आहे. वैभववाडी तालुक्याच्या प्रशासनाकडून संस्थेच्या कार्याला सहकार्य राहील असे तहसीलदार श्री. सुर्यकांत पाटील यांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर
नायब तहसीलदार श्री.दिलीप पाटील, श्री.सचिन निकम,
निवडणूक नायब तहसीलदार श्री.शिवाजी सुतार, अशासकीय सदस्य व ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे जिल्हाध्यक्ष प्रा.सुरेश पाटील, तालुका अध्यक्ष श्री. कुमार स्वामी
पुरवठा निरीक्षण अधिकारी श्रीम. गायकवाड, पुरवठा निरीक्षक श्री.रामेश्वर दांडगे उपस्थित होते.
दिप प्रज्वलन व स्वामी विवेकानंद प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली.
१५ मार्च रोजी जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षीचा ४४ वा जागतिक ग्राहक दिन “सुरक्षित उत्पादने, आत्मविश्वासपूर्वक ग्राहक” या संकल्पनेवर साजरा होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॅान एफ केनेडी यांनी मांडलेल्या ग्राहक हक्काच्या स्मरणार्थ जागतिक ग्राहक दिन साजरा केला जातो. भारतात ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांनी ग्राहक चळवळ उभी केली. १९८६ च्या ग्राहक संरक्षण कायद्याने प्राप्त हक्क, अधिकारांचा वापर करीत असताना कर्तव्ये पालन तितकेच महत्त्वाचे आहे.
फसू नका, कुणाला फसवू नका
सजग बना, इतरांना सजग बनवा असे आवाहन प्रा.सुरेश पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात केले.
तसेच तालुका अध्यक्ष श्री.कुमार स्वामी यांनी ग्राहकांचे हक्क, वीज ग्राहक, स्वच्छता, युद्धजन्य परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व वितरणाकडे प्रशासनाने लक्ष द्यावे असे आवाहन केले.
अशासकीय सदस्य व तालुका सचिव श्री. तेजस साळुंखे यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची पार्श्वभूमी, रचना, तत्वज्ञान, संस्था सभासद निकष, कार्यपद्धती व समस्या निवारण पद्धती याबाबत माहिती दिली.
तालुका सल्लागार अॅड.प्रताप सुतार यांनी नवीन ग्राहक संरक्षण कायदा-२०१९, माहितीचा अधिकार व त्यातील महत्वाची कलमे यांची माहिती दिली. या कार्यक्रमाला जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य व संस्थेचे जिल्हा सचिव संदेश तुळसणकर, अशासकीय सदस्य महेश संसारे, तालुका शाखा उपाध्यक्ष मंगेश चव्हाण,
महिला सहसंघटिका संपत्ती चौगुले, सहसचिव विद्या पाटील,
कोषाध्यक्ष सुधाकर पुरीबुवा, सल्लागार एस.पी.परब, सदस्य जयवंत पळसुले, मनाोज सावंत
उपस्थित होते. तसेच तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, रेशनिंग दुकानदार व
सौ. पांचाळ, सौ. खांबल, सौ.माने इत्यादी महिला
ग्राहक वर्ग उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन लिपिक रोहिणी पाटील तर आभार श्री.रामेशवर दांडगे यांनी मांडले.

प्रतिक्रिया व्यक्त करा