You are currently viewing वीजदर सवलतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

वीजदर सवलतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

वीजदर सवलतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

 कृषीपशुसंवर्धनदुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या शासन निर्णयानुसार मच्छिमारमत्स्यसंवर्धकमत्स्यव्यवसायिकमत्स्यकास्तकारमत्स्यबीज मत्स्यबोटूकली संवर्धक तसेच मत्स्यव्यवस्थापनाशी संबंधित घटकांना (मत्स्यप्रक्रिया उद्योग वगळून) कृषी समकक्ष दर्जा देण्यात आलेला आहे.

या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना कृषी दराप्रमाणे वीजदर सवलत देण्यात येणार असून ही सवलत लघुदाबउच्चदाब तसेच अतिउच्चदाब वीज जोडण्यांसाठी लागू राहणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यात अर्ज भरून सहाय्यक आयुक्तमत्स्यव्यवसाय कार्यालय येथे सादर करावाअसे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयार्मात करण्यात आले आहे.

अर्जाचा नमुना तसेच अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्तमत्स्यव्यवसाय, दूरध्वनी क्र. ०२३६५ २५२००७ किंवा acfsdurg@gmail.com ईमेल  वर संपर्क साधावा.

सोबत : QR कोड

प्रतिक्रिया व्यक्त करा