शहीद दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
सिंधुदुर्गनगरी
शहीद दिनानिमित्त जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे म्हणाल्या की भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी अत्यंत कमी वयात प्रगल्भ विचारसरणी, देशभक्ती आणि त्यागाची भावना जोपासली. त्यांचे कार्य आणि विचार आजही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहेत. शहीद दिनाच्या निमित्ताने त्यांच्या विचारांचे स्मरण करून त्यानुसार आचरण करण्याचा संकल्प करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी शारदा पोवार, आरती देसाई तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
