You are currently viewing भाजप दिव्यांग विकास आघाडी सिंधुदुर्ग यांच्या वतीने गेट-टुगेदर,वनभोजन व अभय शिंगाडे यांचा वाढदिवस यशस्वीपणे संपन्न

भाजप दिव्यांग विकास आघाडी सिंधुदुर्ग यांच्या वतीने गेट-टुगेदर,वनभोजन व अभय शिंगाडे यांचा वाढदिवस यशस्वीपणे संपन्न

*भाजप दिव्यांग विकास आघाडी सिंधुदुर्ग यांच्या वतीने गेट-टुगेदर,वनभोजन व अभय शिंगाडे यांचा वाढदिवस यशस्वीपणे संपन्न*

सिंधुदुर्ग

भाजप दिव्यांग विकास आघाडी सिंधुदुर्गच्या यांच्या वतीने दिनांक 22 मार्च 2026 रोजी सकाळी ठीक ११.००वाजता कसाल गावचे सरपंच श्री.राजन परब यांच्या बागेमध्ये महिला दिनानिमित्त मला वनभोजन आणि अभय शिंगाडे यांचा वाढदिवस उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवराचे स्वागत समारंभ करून झाली.त्यावेळी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग सदस्य सौ. सुप्रिया वालावलकर, कसाल गावचे सरपंच श्री.राजन परब, अमर आंबेरकर, भाजप दिव्यांग विकास आघाडी सिंधुदुर्गचे जिल्हा संयोजक श्री अनिल शिंगाडे, श्यामसुंदर लोट, सुनील तांबे, प्रकाश वाघ, बाबुराव गावडे,सविता गावडे,शिल्पा घाडीगावकर, अभय शिंगाडे,कर्मचारी विशाखा कासले, ललित गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत समारंभ करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.त्यानंतर सर्वांच्या उपस्थितीमध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. श्री.सुनील गणपत तांबे कोशाध्यक्ष,श्री.अमर गणपत आंबेरकर देवगड तालुका प्रभारी, श्री.दिपक लऊ करंगुटकर वेंगुर्ला तालुका प्रभारी,सौ.सविता बाबुराव गावडे सावंतवाडी तालुका प्रभारी या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना जिल्हा परिषद सदस्या सौ सुप्रिया वालावलकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आली. व त्यांचे अभिनंदन करण्यात आले.त्यानंतर सर्वांनी एकत्र येऊन भोजनाचा आनंद घेतला निसर्गाच्या सानिध्यात खेळ, गाणी अशा विविध मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला ३० हून जास्त दिव्यांग बांधवा उपस्थित होते.गेट-टुगेदर मुळे सहभागी झालेल्या सर्वांनी कार्यक्रमाचे कौतुक करत आनंद व्यक्त केला कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे सर्वांनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा