*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*प्रणयचेष्टा…..!!!*
अचंब्यांना जन्म देतादेता
प्रणयचेष्टांनी ओशाळली धरा
रहाटी सृषीरूपाची हाकत
ईश्वराचा प्रपंच सारा..
विरल्या इंद्रधनुष्य किरणांचा
असह्य …दाह झेलल्या
स्पर्शातून चिंब भिजण्याच्या
कामना …अधुरी ठेवल्या..
अबोल्या वारियाचा कोंडमारा
उडून लपला.. रतीसुखात
ओथंबून गच्च भिजण्याची
मनीषा पेटत्या धग..धगात…
धरेने आनंदाने ..लाजून
मनाचे संकेत पाळले
वनश्रीच्या अनघ लळ्यानं
मोहकरूप कायेवर मोहरले..
रंगेल रूप.. धरेचे
उसळत्या लयीत.. चेकाळलं
पाघळला …घनांचा नूर
लाघवी भुलींनं..ओशाळलं..
नख-याने बहकला आसमंत
अंगरूप धरेचं ..संगमानं
लयीतून उसळला प्रीतीगंध
डोळे मिटले ..आभाळानं…
बाबा ठाकूर
